पायावरून टेम्पो गेलेले आजोबा

       

पायावरून टेम्पो गेला, टेम्पो वाला फरार, म्हातारपणी या अवस्थेत घरच्यांनी साथ दिली नाही.

नाईलाजाने रस्त्याच्या कडेला पडून राहावं लागलं. काही दिवसांनी परत accident झाला याच अवस्तेथ आजोबा धारावी (मुंबई) येथे सापडले.आजोबांना वेवस्तीत बोलता येत नाही बोलले तरी कळत नाही. नाव – अशोक वामन त्रिभुवन, मूळचे गाव शिवरई, वैजापूर तालुका ,औरंगाबाद.सायनला (मुंबई)परिवार आहे मला त्यांना भेटायचं आहे म्हणतात.
आम्ही शोधलं पण कोणीही भेटलं नाही.आजोबांना त्यांची खूप गरज आहे कृपा करून नातेवाईकांनी समोर येऊन आजोबांना साथ द्यावी कारण ते जाणीव आश्रमात थांबत नाहीत त्यांना तुमची गरज आहे. आम्ही आजोबांना सगळं देऊ पण नातेवाईकांच प्रेम आपणच देऊ शकता.

सर्वांच्या धावपळीने आजोबांना आजोबांच्या संबंधित नातेवाईकडे पाठवण्यात आले आहे सर्वांचे आभार.